रात्रीचे आजूबाजूला २० km जंगल त्यातून ही एकटी मुलगी, मग पहा त्या दोन मुलांनी हिच्या सोबत काय केले..

बसस्टॉपवर उतरून चित्रा घाईघाईने चालत रिक्षास्टँडजवळ आली. एक रिक्षावाला तोंडात जळक्या बिडीचे थोटूक ठेवून मागच्या सीटवर बसला होता. सोबत त्याचा टपोरी वाटणारा मित्रही होता. नुकत्याच कसल्यातरी फालतू जोकवर दोघे खदखदून हसत होते. “रिक्षा आहे का?, मला दासगावला जायचंय”, दोघेही भानावर येऊन चित्राकडे बघू लागले. करकरीत संध्याकाळची वेळ. अतिशय सुंदर दिसणारी चित्रा, दोघांनी एकमेकांकडे सहेतुक नजरेने बघितल्याचा भास झाला. चित्राला, पण इलाज नव्हता. आसपास कुणी नव्हते. काळोख पडायला लागला होता. नेटवर्क होतं.

तिने चटकन दोघांचा फोटो काढून ताईला व्हाॅटस्अपवर पाठवला आणि रिक्षाचा नंबरही कळवला.., आणि आपण हे केलंय हे ही दोघांना सांगितले, दोघे काहीही बोलले नाही. फक्त हसले.., दोघेही राकट आणि आडदांड दिसत होते. रिक्षा सुरु झाली…बावीस किलोमीटरचं घनदाट जंगल.., एकाकी रस्ता.., समोर चिटपाखरूही नाही. नेटवर्कही गेलं.., अशा सुनसान रस्त्यावरून रिक्षा चालली होती. मित्र रिक्षाचालकाच्या गळ्यात हात टाकून जरा अवघडून पुढेच बसला होता. दोघांच्या गप्पांचे विषय चित्रा ऐकत होती. 1982 मधे रिलीज झालेले सिनेमे, गाणी यावर दोघंही.

नाॅस्टॅल्जिक गप्पा मारत होते.., वेळ जावा म्हणून हीनेही गप्पात भाग घेतला पण गंमत म्हणजे त्या दोघांनाही नव्या सिनेमांची, नटनट्यांची नावंही माहिती नव्हती. त्यांना इंटरनेट, फेसबुक, व्हाॅटस्अप म्हणजे काय हे ही समजत नव्हते. दोघांनाही 1985 नंतर सिनेमा बघणं सोडून दिले आहेत.. रिक्षाचालक अशोक आणि मित्र बाबू.., तरीही चित्राची भिती काही कमी झाली नव्हती. मधूनच बाबू मागे वळून बघायचा तेव्हा तिच्या काळजाचा ठोका चुकायचा. सरतेशेवटी दासगाव आलं. नाक्यावर एक धुरकट दिवा जळत होता. दोन पावलांवर सदुमामाचं घर. घरातले दिवे दिसत होते.

“दादा, किती झाले पैसे?”, चित्राने अशोकला विचारलं. त्यावर राकट चेहर्याचा अशोक हसला, “ताई पैसे कसले हो. तुम्हाला सुखरूप सोडणं हेच आमचं काम. या रस्त्यावर 1986 साली आमच्या गावातल्या बापूराव पाटलाने आपल्या सहा मित्रांसोबत याच जंगलात एका निष्पाप पोरीवर बलात्कार केला होता. तेव्हा मी आणि बाबूने विरोध केला तर आमचाही खून केला भडव्यानं…” चित्राच्या पायाखालची जमीन सरकली.. “तेव्हापासून आम्ही दोघे संध्याकाळी उशीरा कोणी एकटी भगिनी आली तर. तिला दासगावपर्यंत सोडतो ताई.., आम्ही तेव्हाचे शिवसैनिक ताई..

पोरीबाळींच्या आबरूला हात लावायची हिम्मत कुणी केली तर आम्ही मेल्यानंतरही सोडत नाही.., ताई सुखरूप जा.., कधी पण या रस्त्यावर काही पण आडचण आली तर अशोकदादा, बाबूदादा हाक मारा फक्त. आमी आहोत”. चित्राला चक्कर आल्यासारखं झालं. आता त्या सुनसान चौकात कुणीही नव्हतं. चित्रा जड पावलांनी सदुमामांच्या घराकडे चालू लागली. चौकातला धुरकट दिवा तसाच जळत होता. रात्री ताईचा फोन आला….व्हाॅटस्अपवर नुसते रिकाम्या रस्त्याचे आणि कसलेतरी अनाकलनीय आकडे कशाला पाठवले म्हणून विचारत होती. चित्रा काहीच बोलली नाही.

मित्रांनो हा लेख जनजागृती करण्यासाठी लिहण्यात आलेला आहे, आणि आम्ही सर्वांना हा संदेश देऊ इच्छितो की, एकटी मुलगी संधी नाही तर तर जवाबदारी आहे, महिलांचा आदर करायला शिका. मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला कमेंट करून आम्हाला सांगायला विसरू नका. तुमची एक कमेंट आम्हाला असे नवनवीन लेख तुमच्या पर्यंत पोहचवण्यास प्रोत्साहित करतात.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!