फक्त धातीवर स्कार्फ नसल्यामुळे या मुलीसोबत घडले असे काही की पाहून तुम्हाला धक्काच बसेल..

एक मीरा नावाची साधी मुलगी आपल्या आईसह राहत होती. तिचे वय जास्त नव्हते, पण ती तरुण होती. धड सुंदर नव्हे पण कुरुपही म्हणता येणार नाही अशी, फार उंच नव्हती पण फार खुजी होती असेही नाही. ती आरशात पहायची तेंव्हा आपण सगळ्याच बाबतीत सामान्य असल्याचे तिच्या लक्षात यायचे, ती एका मल्टीनॅशनल कंपनीत कामाला होती. खरंतर ती सेक्रेटरी होती पण तेच तेच रोजचे काम करताना तिला कंटाळा येऊन जायचा. तिथेही कोणाचे तिच्याकडे लक्ष गेलेच तर लगेच ते आपली नजर वळवून निघून जायचे. ती तिच्या आयुष्यासारखीच त्यांना बोअरिंग वाटायची.

एके सकाळी ती नोकरीवर जायला रस्त्यावर आली तेंव्हा तिला एक नवीन स्टॉल दिसला. तिथे अनेक रंगीबेरंगी स्कार्फ होते. तिने जवळ जाऊन पाहिले आणि आत गेली. आणखी एक तरुण तिथे वस्तू खालीवर करत होता, तिथले गॉगल घालून पाहत होता. त्याशिवाय स्टॉलची मालकीण आणि तिची छोटी मुलगी काउंटर जवळ दिसल्या. तिनेही कपडे पाहायला सुरुवात केली. जरा वेळाने तिला एक स्कार्फ खूप आवडला. तिने तो घेतला आणि गळ्याभोवती छानपैकी टाकला. ती छोटी मुलगी लगेच म्हणाली, आई, ती बघ ताई, किती सुंदर दिसते आहे स्कार्फ घातल्यावर!, ते ऐकून ती.

मालकीण सुद्धा म्हणाली “खरेच हा स्कार्फमुळे तुम्ही छान दिसताहात !” ते पाहून तो तरुणही त्याच्या पसंतीचा गॉगल घालून तिथे आला आणि सहज म्हणाला, “तुम्ही किती सुंदर दिसता ह्या स्कार्फ मध्ये !” आणि तो गेला. ती तिथल्या आरशासमोर गेली आणि तिने स्वतःचे रूप न्याहाळले. जाणतेपणी पहिल्यांदाच ती स्वतःवर खूष झाली. मोठ्या खुषीत तिने पैसे दिले आणि बाहेर पडली. ती बाहेर पडली तेंव्हा तिला सगळे जगच नवे, वेगळे वाटू लागले. त्याआधी तिने कधी फुलांचे रंग नीट पहिलेच नव्हते, हवेचा सुगंध ती आज प्रथमच अनुभवत होती. आज अचानक लोकांचा, गाड्यांचा.

कोलाहल मधुर संगीतासारखा भासत होता. जणू आज तीचे ह्रदय पिसा सारखे हलके होऊन गात गात चालले होते. ती जशी नेहमीच्या कॉफी शॉप समोरून गेली तेंव्हा चक्क एक तरुण उद्गारला..”हाय…! सुंदर प्रिये, मिळून कॉफी घेऊया एक?” ती हळूच हसली आणि तरंगत चालत राहिली. ती जशी ऑफिसच्या दाराशी आली तेंव्हा लिफ्टमन चक्क तिला “गुड मॉर्निंग” म्हणाला….!. ह्या आधी तो कधी तसे म्हणाल्याचे तिला आठवत नव्हते. लिफ्टमध्ये सुद्धा इतर तिला पुढे होऊन विचारत होते, कुठला फ्लोर?. आफिसमध्ये आली तर सगळे भुवया उंचावून तिच्याकडे पाहत होते.

जणू अप्रत्यक्षपणे म्हणत होते ‘वॉव !” त्यादिवशी मॅनेजरनी तिला लंचला आमंत्रित केले. तिची विचारपूस करताना कामावर काही त्रास तर होत नाही ना असे विचारत होते. तिने ह्या स्पेशल दिवसादिवशी बस ऐवजी टॅक्सीने घरी जायचे ठरवले. तिने हात करताच दोन टॅक्सीवाले थांबले. ती टॅक्सीत मागच्या सीटवर बसल्या बसल्या आजच्या जादुई दिवसाबद्दल विचार करत बसली. तिच्या नव्या स्कार्फने तिचे जीवनच बदलले होते. घरी आईने दरवाजा उघडला. तिला पाहिल्या पाहिल्या आईचा जीव भांडयात पडला. किती सुंदर दिसत होती आज तिची लाडकी! ती उद्गारली, मीरा.

आज किती गं छान दिसते आहेस. तुझ्या डोळ्यातली चमक तर अगदी तुझ्या बालपणाची आठवण करून देत आहे. माझी परी !, “अगं काय गम्मत सांगू तुला आई, ह्या नव्या स्कार्फमुळे माझा आजचा दिवस फार फार आनंदात गेला.” , ती उत्तरली. “स्कार्फ?, कुठला स्कार्फ?” आईने आश्चर्याने विचारले. काय?, मीराने छातीवर चाचपून पाहिले. तर काय, तिचे आयुष्य बदलणारा तो स्कार्फ. तिच्या अंगावरून गायब झालेला होता. ती हादरलीच. तिने भराभर आजचे सगळे प्रसंग डोळ्यांसमोर आणले. कुठे हरवला असेल? टॅक्सीत तर मी त्याला हात लावला नव्हता. मग कुठे?.

लंचच्या वेळी?, ती खुळ्यासारखी तपासत, आठवत राहिली. मागे जात जात ती स्कार्फच्या स्टॉलपर्यंत आली. तिथे तिची आठवण थबकली, अरेच्च्या! मी पैसे दिले, पण स्कार्फ घ्यायलाच विसरले, तिने नीट आठवून पाहिले. तिने तो अंगावर टाकून बघितला. कौन्तर जवळ आली. पैसे दिले..पण होय, स्कार्फ घेतलेला तिला आठवेना….!, होय स्कार्फ न घालताच ती दाबात. आत्मविश्वासाने रस्त्यावर आली होती ! किती कौतुकाने लोक पाहात होते तिच्या सौंदर्याकडे ! स्कार्फ नसून सुद्धा…. तर अशाप्रकारे त्या स्कार्फने मीराला मुक्त नव्हते केले, तर तिच्या विचारांनी. तिचा विचार.

की ‘मी सुंदर आहे’, तिचा दिवस सुन्दरतम करून गेला….!, आपल्याला बांधून ठेवणारी, आनंदापासून पारखी करणारी सर्वात मोठी शक्ती शक्ती कोणती असेल तर आपले विचार. आणि हेच विचार आपल्याला आनंदाचे डोही डुंबऊन उच्चतम नेऊ शकतात. आपले विचार आपल्याला हवे ते करण्याची, हवे ते मिळवण्याची शक्ती प्रदान करतात. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार….!, मी आणि माझा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टीकोन मला आनंदी राहण्यापासून रोखू शकतो. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!