सुनेला ४ वर्षात एकही मुलबाळ झाले नाही म्हणून सासूने तिचे केले असे काही की पाहून तुम्हाला..

निशा उंबऱ्यावरच माप ओलांडून सोनपावलाने घरात आली. अत्यन्त धुमधडाक्यात, मोठया थाटामाटात लग्न झालं होतं तिचं!, लग्नानंतर सत्यनारायण रिसेप्शन सुध्दा अत्यन्त सुंदर झालं. सगळी हौस-मौज, सर्वत्र कौतुकाचा वर्षाव!, अगदी भारावून गेली निशा!, अगदी सुरळीत सुरू झाला संसार निशाचा!, लग्नानंतर माहेरची येती-जाती, पहिले सणवार, मंगळागौर यात 6-7 महिने कसे गेले कळलंच नाही. निशा सुखात नहात होती जणू!, स्वप्नांचे पंख लावून फिरत होती. ती लाडकी झाली होती सर्वांची!, सासूबाईंचे तर पान हलत नव्हते निशाशिवाय!, यानंतर मात्र निशाच्या सासूबाईंनी लगेच नातवाच तोंड बघण्याचा ध्यास घेतला.

प्रत्येक महिन्याला तिचे पिरियड स सुरु झाले की, नातवासाठी त्यांची भुणभुण सुरू व्हायची!, त्या म्हणायच्या, ‘आता पुढच्या वेळी मात्र गोड बातमी मिळालीच पाहिजे. असे करत करत वर्ष-दीड वर्ष उलटले तरी निशा कांहीं देऊ शकली नाही, ‘ती गोड बातमी!’, हळूहळू सासूबाईंच्या स्वभावात बदल होत गेला. त्या छोट्या छोट्या कारणासाठी चिडचिड करू लागल्या. मूल होण्यावरून तिला टोमणे मारू लागल्या. ‘अवि ‘ तिचा नवरा मात्र शांत होता. तिचे सासरेही म्हणत, ‘सासूबाईंच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस’. बघता बघता लग्नाला 4 वर्षं झाली. आतां मात्र निशा,अवि,व तिचे सासरे यांनाही निशाला मूल होण्याची उत्सुकता.

लागून राहिली. आता नातवंडं पहायला मिळावं असं सासऱ्यानीही बोलून दाखवलं. निशा आणि अवि या दोघांनीही गुपचूप जाऊन दोघांचीही तपासणी केली. डॉ.च्या म्हणण्यानुसार कुणातच दोष नव्हता. औषधोपचार केले पण त्यांना यश आलं नाही. आता निशाला सासूबाई नी जास्तच त्रास द्यायला सुरुवात केली. तिला अगदी असह्य होऊ लागला तो त्रास!, आता निशाने घटस्फोट द्यावा व अविने दुसरे लग्न करावे. असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली.रोज घरात भांडणे, कटकटी, आदळ-आपट, अशांतता!, अविला तर घरात यायलाच नको वाटायचं. एके दिवशी तर कहरच झाला. सासूबाई, निशा, अवि यांचं कडाक्याचं भांडण झालं.

घर अगदी डोक्यावर घेतलं त्या सासूबाईंनी!, त्यांनी निशाला अगदी नको ते अपशब्द वापरले. शेवटी आईच्या तोंडाच्या पट्ट्यापुढं अविसुद्धा हतबल झाला. शेवटी चिडून व निराश होऊन अवि म्हणाला,”एवढं सगळं सोसण्यापेक्षा तू सरळ घटस्फोट घेऊन मोकळी हो”. या वाक्याने निशा मात्र आता पूर्णपणे कोसळून गेली. तिच्या हृदयात खोल कुठंतरी जखम झाली. तिने मनाशी ठाम निर्णय घेतला मात्र!, आता घटस्फोट घ्यायचाच!, तिने सर्वांना निर्णय सांगितला. सर्वांनी तिचं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला. अविसुद्धा ‘मी राग अनावर होऊन व अत्यंत निराशेपोटी तसं म्हणालो’ असं म्हणाला. तो तिला ‘सॉरी’ सुध्दा म्हणाला.

पण आता निर्णय मात्र बदलला नाही निशाचा थोड्याच दिवसात रीतसर घटस्फोट झाला. निशा माहेरी गेली. तिचा भाऊ-वहिनी खूप चांगले होते. त्यांनी धीर दिला तिला !तिनं तिथंच एका छोट्या कंपनीत नोकरी धरली. तिनं ड्रेस डिझायनरचा कोर्स केलेला असल्यानं एका मोठ्या लेडी टेलरकडेही मदतीला जाऊ लागली. सुरळीत सुरू झालं आता तिचं जीवन!, पण कितीही झालं तरी आई वडिलांचं काळीज!, तरणी ताठी पोर अशी माहेरी येऊन बसली याचा धक्का त्यांनी घेतला. वर्ष दीड वर्षातच दोघेही हार्ट अटॅकने गेले. पण भाऊ वहिनीने तिला अजिबात एकटेपणा जाणउ दिला नाही. सर्वांनी सांगून बघितले पण लग्नाचा ‘जुगार’ती पुन्हा.

खेळायला तयार नव्हती. आज निशाचा भाचा ‘श्री’ बागेत चल म्हणून निशाच्या फारच मागे लागला होता. शेवटी ती श्री ला घेऊन बागेत गेली. बागेत श्री खूप छान खेळला.घसरगुंडी, झोका, सिसॉ, मेरी गो राउंड, सगळे खेळ तो अगदी मनसोक्त खेळला, निशालाही एक मैत्रीण भेटली. दोघींनी आपली सुख-दुःख शेअर केली. ‘श्री’ खेळून दमला, आता त्याला आईस्क्रीम खायचं होतं. म्हणून ती त्याला घेऊन निघाली. तिच्यापुढेच एक माणूस बाबगाडीतून एका बाळाला घेऊन चालला होता. तिला उगीचच तो तिचा नवरा ‘अवि’ असल्याचा भास झाला. क्षणभर तिच्या हृदयात कळ आली आणि पुन्हा तिचं मनच तिला म्हणालं,’ छे ‘ काहीतरीच.

काय!, हा ‘अवि ‘कसा असेल?, तो तर मुंबई मध्ये असतो.’ तिनं आपली आपणच मान झटकली. तिचं लक्ष त्या बाबागाडीतल्या बाळाकडं गेलं, बाळ गोड हसला. त्याच्या गालावर अविसारखीच खळी पडली होती. तिनं सहज बाजूला पाहिलं आणि हबकलीच ती!, तो अविच होता. त्यानंही तिच्याकडं पाहिलं, एकमेकांना पहातच राहिले दोघेही!, शेवटी तोच म्हणाला, कशी आहेस?इथेच असतेस का?, “तिनं विचारलं, तू इथं कसा?”, “माझी इथं बदली झालीय”, त्यानं उत्तर दिलं, ती जुजबी बोलून निघाली पण त्यानंच तिला थांबवलं. त्यानंच सुरुवात केली.तो म्हणाला, 10 वर्षे झाली पण मी तुला एक दिवसही विसरू शकलो नाही.

मला तुझ्याकडं मन मोकळं करायचंय!, बैस ना थोडावेळ!, “शेवटी ती नाविलाजने बसली.तोच बोलू लागला,” आपल्या घटस्फोटानंतर जवळ जवळ 2 वर्षे मी लग्न केलं नाही. मी तयारच नव्हतो पण आईनं जीव देण्याची धमकी दिली म्हणून मी शेवटी लग्न करावं लागलं. पण तुझी सर तिला अजिबात नाही. निशाने तिचं नावही विचारलं नाही. त्यानंही फक्त ‘ती’असा उल्लेख केला. सुरवातीला खूप चांगली वागली ती!, पण हळूहळू घर ताब्यात घेतलं तिनं, आम्हाला दोन मुलं झाली. मोठा 5 वर्षांचा आहे, ती घरात काहिही काम करत नाही. ती आईला खूप त्रास देते. मुलं संभाळण्यापासून घर संभाळण्यापर्यंत सगळं आईच करते.

आई पण आता थकलीय, परवा आई खूप आजारी होती. तिला कपभर चहा सुध्दा तिनं करून दिला नाही.तेंव्हा मात्र आई बोलून गेली इथं निशा असती. तर तिनं जेवण सुध्दा मला भरवलं असतं. खरंच ,माझं तेंव्हा चुकलंच, मी आणखी थोडे दिवस तिला मूल होण्याची वाट पहायला हवी होती. शेजारच्या काकूंना सुध्दा 5 वर्षांनी मूल झालंय म्हणे.खरंच चुकलंच!, पण आता हातातून निसटून गेलेली वेळ परत येणार आहे थोडीच?, निशा घरी आली पण तिच्या हृदयातील नुकतीच खपली धरलेली जखम मात्र पुन्हा भलभळायला लागली. तिच्या व त्याच्या जीवनात आता कोणताही बदल होणे शक्य नव्हते.

ती मनाशीच म्हणाली,’तुका म्हणे उगा रहावे, जे जे होईल ते पहावे’. मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!