जेव्हा लग्नानंतर मुलीला नवऱ्याचा बेड प्रॉब्लेम समजतो, तेव्हा पहा ती त्याच्या सोबत काय करते..

शेवटच्या वर्षाचा शेवटचा पेपर दिला होता. मित्र मैत्रीणींच्या घोळक्यात मी बसले होते पण माझे मन अजिबात त्यांच्यात रमलेले नव्हते. मी माझ्याच विचारांच्या तंद्रीत होते. पेपर चे टेन्शन नव्हते काही डोक्यात पण घरी लग्नाची बोलणी सुरु होती. आणि माझी अजिबातच लगेचच लग्न करण्याची मानसिकरीत्या तरी तयारी नव्हती, मला पुढे MD करायचे होते. जरा प्रक्टीस मध्ये सेटल झाले कि, करूयात लग्न असे माझे मीच ठरविले होते. पण आई वडील तयार नव्हते, माझ्या पाठची बहीण शिक्षणात जरा मागे होती. मी नाही लग्न केले तर तीचेही माझ्यामुळे लांबणीवर पडेल..

आणि तसेही MD करायचे तर लग्नानंतरही करता येईलच कि, असे अनेक मते मतांतरे होते घरात, त्याच विचारात घरी आले. माझ्या शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या पेपर पेक्षा आलेल्या स्थाळाचीच चर्चा जास्त होती घरात, आई वडीलांनी यावेळी जरा स्पष्टच विचारले मला तुझे बाहेर काही आहे का?, असेल तर तसे आधीच सांग, त्यामुळे तु लग्नाला नकार वगैरे देत नाहीस ना?, असे प्रश्नांची तोफ माझ्यावर डागली.., नाही.., असे काही. फक्त मला नाही वाटत इतक्यात लग्न करावे असे सांगितले. त्यावर त्यांनी त्यांचे व इतर नातेवाईकांचे दाखले द्यायला सुरूवात केली.

कुणी कधी व किती कमी वयात लग्न केले वगैरे आणि एकादा लग्न झाले कि होईल आपोआपच सवय.., आणि शिक्षण ही घेताच येईल कि पुढे.., सरकारी नौकरी आहे मुलाला.., लाखो कमावतो महिन्याला शिवाय एकुलता एक, दिसायला ही चांगला आहे, ह्या ना त्या पध्दतीने त्यांनी मला समजावन्याचा प्रयत्न केला. मी ही जरा विचार केला मुलगा दिसायला खरंच छान होता, नाकारता येईल, असे काही नव्हते त्याच्यात, दोन चार दिवस विचार करुन मी हो म्हटले. बघण्याचा कार्यक्रम पार पडला.., पसंती झाली.., घेणे देणे ही ठरलेले, लागलीच पुढच्या आठवड्यात.

साखरपुडा करायचे ठरले. हे सर्व वडीलधारी मंडळीनी इतक्या घाईघाईने केले. मला तर अजूनही विश्वास बसत नव्हता कि मी लग्न करतेय, साखपुडा झाला.., आणि लगेचच महिनाभराच्या अंतराने लग्नाची तारीख ठरली. होणाऱ्या जोडीदाराशी बोलावे, जरा ऐकमेकांना जाणून घ्यावे या मधल्या वेळात असे प्रत्येकाला वाटते मी ही त्याला अपवाद नव्हते. साखरपुड्याआधीच ज्यावेळी मुलगी बघायचा कार्यक्रम झाला तेव्हाच आमची फोन नंबरची देवाणघेवाण झाली होती. तरीही एकदासुध्दा त्याने मसेज किंवा फोन केला नाही. हे जरा मला खटकले..

याबद्दल आईला सांगितलं तर ती म्हणाली, तुझी होणारी सासूबाई सांगत होत्या जरा लाजरा बुजरा आहे मुलगा.., फार मित्रांमध्ये नसतो.., अबोल स्वभावाचा आहे.., म्हणून नसेल केला त्याने कॉन्टक…. त्यात काय येवढे, फारच घाई झाली वाटतं तुला होणाऱ्या नवऱ्याशी बालोयची, असे थट्टेवारी विषय टाळला. मग साखरपुड्याच्या दुसऱ्या दिवशी मी स्वतःच त्याला फोन केला. जरा कामात आहे असे बोलून त्याने फोन ठेवला. माझा हिरमोड झाला, पण संध्याकाळी त्याचा फोन आला, बराच वेळ बोलत होता. असे जरा बोलणे वाढल्यावर जरा मोकळीक जाणवायला लागली.

एकदा कॉफीसाठी भेटूया असे मीच पुढाकार घेऊन म्हणाले, त्याने चक्क नकार दिला, कामाचे काही काहीसे कारण सांगितले. मीही पुढे बोलली नाही काही, फक्त फोन आणि चटवर बोलणे होई.. असे करता करता लग्नही झाले. पण आम्ही एकदाही समोरासमोर दोघे भेटलो नाही, जेव्हा कधी भेटायचा योग यायचा त्याची आई किंवा कुणीतरी सोबत असायचे, लग्नानंतर परतमुळ होईपर्यंत सर्व पार पडले, सत्यनारायण पुजा वगैरे रीतसर झाले. मी माझ्याच विचारात होती, आज पहिलीच रात्र होती आमची. प्रत्येक मुलीसारखी माझी ही काही स्वप्ने होती याबद्दल..

पण झाले उलटेच, त्याची अचानक तब्बेत बिघडली असे म्हणून तो दवाखान्यात जायला निघाला. मी अंतिम वर्षाचे पेपर जरी दिले असले तरी थोडेफार औषधी माहीत होत्या मला, त्याला तपासून औषधी दिली जरा आराम करतो म्हणून तो झोपी गेला. मीही नंतर झोपी गेले. पण हे रोजच व्हायला लागले. कधी खूप काम होते म्हणून थकलो तर कधी बरे वाटत नाही ह्या सबबी वर तो रात्रीचा सहवास टाळत होता. वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे माझ्या जरा लवकरच लक्षात आले, म्हणून एक दिवस मी त्याला या विषयावर बोलते केले तर तो भंयकर चिडला. सर्व घर डोक्यावर घेतले.

शांत अबोल असणाऱ्याकडून अशी रिअक्शन मला नविनच होती. सासु सासऱ्यांना सांगितले तर ते म्हणे आधीपासून तो मुलांच्या शाळेत होता. कॉलेजातही फारसा मुलींना तो बोलत नसे, जरा लाजाळू आहे म्हणून होत असेल, पण माझे मन मानायला तयार नव्हते, घरी आई वडिलांशी याविषयी बोलली. मग चार दोन मिटींग झाल्या.., मध्यस्तींच्या.., नातेवाईकांच्या, प्रश्न गंभीर होता, त्याला मेडीकल प्रॉब्लेम आहे हे माहित असूनही सरळ सरळ माझी व माझ्या घरच्यांची फसवणूक झाली होती. इथे मुद्दा फक्त शारीरिक विकलंगता हा नव्हता.

वैद्यकिय उपचाराने कदाचित तो बरा झालाही असता किंवा नसता तो नंतरचा भाग होता. खरं तर शारीरिक गरज होती, हे मी नाकारत नाही, ती तर होतीच पण त्याहीपेक्षा जास्त गरज एक स्त्री म्हणून जोडीदाराकडून हवे असलेले प्रेम…., आपुलकीचे शब्द हवा हवासा वाटणारा आधार आणि सर्वात महत्त्वाचे जे हवे तो विश्वास, हे सर्व हवं असते. पण यातले काहीच माझ्या वाटेला आले नव्हते. विश्वासघात तर झालाच होता, कितीही नाही म्हटलं तरी आई वडीलांच्या इच्छेखातर लग्नाला तयार झाल्यावर त्या महिनाभराच्या बोलण्यानेही एक ओढ.

एक नातं नकळतच तयार झाले होते. मला राहून राहून प्रश्न पडत होता असे का केले असेल, निदान त्याने तरी सांगायला हवे होते. उत्तर सोपे होते, लग्न करुन नंतर घटस्फोट झाला तरी घटस्फोटीत म्हणून पुरुषांना समाजात मिरवणे अवघड नसते. तिथे त्याच्या पुरुषत्वाला धक्का नसता लागला आणि समाजात नाव ही नसते ठेवले. पण लग्न नाही केले तर त्याला पुरुषत्वाची जाणिव करुन देणाऱ्या प्रश्नांची उत्तरे वांरवार द्यावी लागली असती. कारण कधीतरी कुणीतरी बोट दाखविले असते. फार गाजावाजा करायची गरज नाही देणेघेणे काय असेल करुन टाकू.

वरतून जेवढे हवे तेवढे पैसे देऊन प्रकरण मिटून टाका असे सर्वांमते ठरले. जे ते ज्याच्या त्याच्या मार्गी निघून गेले. पण माझ काय…., या सर्वांमध्ये माझे काय चुकले, इच्छा नसतानाही आई वडिलांच्या मर्जीखातर मी लग्न केले. त्याबदल्यात मला काय मिळाले. मी कितीही ओरडून जगाला सांगितले तरी माझ्या व्हर्जीनीटी बद्दल हजार प्रश्न उपस्थित राहणार. आणि दोष त्याच्यात असूनही ‘नवऱ्याने टाकलेली’ हे बिरूद मला चिटकणार होते. उच्चशिक्षण घेऊन MD करण्यचे स्वप्नं बघणारी मी, नावापुढे ‘घटस्फोटीत’ आणि ‘टाकलेली’ या दोन शब्दांच्या.

फेऱ्यात आयुष्यभर भरकटणार होते…. मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!