जेव्हा वडिलांनी मुलीला शिक्षणासाठी बाहेर गावी गावी , तेव्हा पहा मुलीने काय केले..

रेल्वेमध्ये एक 18 ते 21 वर्षाची सुंदर मुलगी चढली, व तिचे रिजर्वेशन असलेल्या सीटवर जाऊन बसली, तिला सोडण्यासाठी तिचे वडील आले होते. ती मुलगी तिच्या रीजर्वेशन असलेल्या सीटवर बसली आणि तिच्या वडिलांना म्हणाली, “पप्पा तुम्ही आता घरी गेला तरी चालेल”,  ट्रेन इथे दहा मिनिटे थांबनणार आहे, इथला दहा मिनिटाचा स्टॉपच आहे, तिचे वडील उदास होऊन म्हणाले, मला काही त्रास नाही बेटा, मी हे दहा मिनिटे तुझ्यासोबत घालू इच्छित आहे. आता तुझे कॉलेज सुरू होणार आहे, आणि आता तू खूप दिवसांनी येणार आहे.

ती मुलगी कॉलेजची विद्यार्थिनी दिसत होती, कारण तिचे वय आणि तिने केलेली वेशभूषा यावरून ती विवाहित नाही असे वाटत होते. ट्रेन सुरु झाली, मुलगी खिडकीच्या बाहेर प्लॅटफॉर्मवर उभा असलेल्या वडिलांना हात हालून बाय करू लागली, आणि वडिलांच्या डोळ्यात अचानक पाणी येऊ लागलं, मुलगी म्हणाली काय पप्पा काय झाले? प्लिज आता रडू नका, ट्रेन ने आता स्पीड पकडले होते, आणि त्या मुलीचे वडील रुमालाने आपले अश्रू पुसत स्टेशनच्या बाहेर जात होते. तिने लगेच तिच्या आईला फोन लावला व म्हणाली, हे काय ग मम्मी जशी ट्रेन सुरु झाली तसें पप्पा रडू लागले…. आता पुढच्या वेळेस मी कधीही पप्पाना मला सोडायला आणणार नाही. मी एकटीच रिक्षाने येईल पण पप्पांना आणणार नाही, चल ठेवते फोन आणि हो पप्पांची काळजी घे.

आम्ही बराच वेळ तिच्या पारदर्शक चष्म्याच्या आत असलेल्या डोळ्यांकडे पाहत होतो, कारण याच आशेने की तिच्या डोळ्यातून येणारे अश्रू दिसावेत. पण आमची घोर निराशा झाली. थोडा वेळ निघून गेल्यानंतर तिने कुणालातरी फोन लावला व बोलू लागली, “हॅलो जानू कसा आहेस? मी आत्ताच ट्रेनमध्ये बसले आहे, उद्या सकाळपर्यंत मी पोहोचेल मला न्यायला स्टेशनवर ये….. लव यु टू यार, मी तुला खूप मिस केले, आता फक्त काही तासांचा हा विरण आहे, उद्या सकाळी मी पोहोचेल”.

मित्रांनो मी मानते की आज कालच्या युगामध्ये आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवणे आवश्यक आहे, यात काही शंका नाही, पण त्याचे दुष्परिणाम पण आहेत, मी असे नाही म्हणत की, बाहेर गावी शिक्षणाला गेलेले सर्वच मुले मुली कशी आहेत. फक्त त्या मुला-मुलींसाठी म्हणत आहे, बाहेर देशातील पाश्त्या संस्कृतीची हवा अशी लागते की मुले-मुली बिघण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही, आणि अशा मुला-मुलींना त्यांचे आई-वडील भाऊ-बहीण त्यांच्यावर असलेले प्रेम विश्वास त्यांच्या लक्षात येत नाही.

त्यांना attracted वाले प्रेम लक्षात राहते ते हे सर्व विसरून जातात की, त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या साठी काय काय कष्ट करून हृदयावर दगड ठेवून आपल्या मुलामुलींना बाहेर गावी शिक्षणासाठी पाठविले असते. पण मुला-मुलीचे पाऊले चुकीच्या ठिकाणी पडतात, आणि त्याचा परिणाम हे मुलं-मुली जाणत नाहीत. यामुळे सर्वांना एक विनंती आहे आपल्या आईवडिलांच्या भावनेशी खेळत आहोतच, पण आपल्या परिवाराच्या इज्जतीचे दिंडोरी सुद्धा काढत आहोत, हे त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे. आणि तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!