फक्त एका शब्दामुळे भिकारी बनून फिरत होते हे सुशिक्षित डॉक्टर जोडपे… जाणून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल..

आम्ही घरी जात असताना आम्हाला वाटेत रोड च्या कडेने एक म्हातारे जोडपे दिसले, आमची ही नेहमीची वेळ होती. आणि त्यातून दुपारची वेळ असल्यामुळे आम्ही त्या भिकारी दिसणाऱ्या जोडप्याला सहजच विचारे तुम्ही कोठून आलात? कुठे निघाला आहात? तुम्ही काही खाल्ले आहे का? थोडे जेवणार का….? त्यावर ते जोडपे नको म्हणाले, मग आम्ही त्यांना थोडे पैसे द्यायला हात समोर केला तर ते सुद्धा नको म्हणाले….., मग आम्ही त्यांना विचारले की, तुम्ही असे का हिंडत आहात कुठे चालला आहात आम्ही काही मदत करू का? मग सुरू झाला त्यांचा जीवनपट त्यांनी आम्हाला असे सांगितले की, ते 2200 km चा प्रवास करून आता द्वारका ला स्वतःच्या घरी चालले होते.

त्यांनी सांगितले की, 1 वर्षांपूर्वी माझे दोन्ही डोळे गेले होते, आणि डॉक्टरांनी देखील सांगितले होते की, ऑपरेशान करून उपयोग नाही…. मग माझ्या आईने डॉक्टरांना भेटून ऑपरेशन करायला भाग पाडले, व तिने श्री कृष्णा मंदिरात जाऊन देवा जवळ नवस केला की, माझ्या मुलाचे डोळे परत आले तर माझा मुलगा पदयात्रा करत बालाजी व पंढरपूर ला जाऊन परत द्वारकेला पायी येइल. म्हणून मी आईच्या शब्दासाठी पदयात्रा करतोय….. मग आम्ही त्यांच्या बायको विषयी विचारले तर, ते बोलले की ती पण मला एकटे सोडायला तयार नव्हती, व रस्त्याने मी तुम्हाला जेवण तयार करून देईन असे म्हणून ती देखील माझ्या बरोबर निघाली.

आणि हे आमचे संभाषण चालू असतात आमच्या लक्षात असे आले की, ते 25 % हिन्दी, आणि 75 %इंग्रजी बोलत होते. म्हणून मग आम्ही त्यांना शिक्षण विचारले, तर त्यांचे उत्तर ऐकून आम्ही सुन्न झालो. त्यांनी लंडन येथे ऑक्सपोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये 7 वर्षे खगोलशास्त्र यावर पी एच डी केली आहे, तर त्यांच्या बायकोने मनोविकार शास्त्र या विषयावर लंडन येथेच पी एच डी केली आहे. आणि विशेष म्हणजे एवढे शिकून सुद्दा त्यांच्या चेहऱ्यावर गर्व सुद्धा नाही…. आणि आपल्याकडे 10 नापास वालासुद्धा छाती ताणून हिंडतोय, आणि एवढेच नाही तर व सी रंगराजन (गव्हर्नर) यांचे बरोबर ,तसेच कल्पना चावला ह्यांच्या बरोबर काम व मैत्रेचे समंध होते.

तसेच त्यांना मिळणारे मासिक पेन्शन ते एक अंध ट्रस्टला देतात. सद्या ते सोशल मेडियापासून लांब राहतात ,रोडच्या कडेन जाणारे प्रत्येक जोडपे भिकारी असते असे काही नाही, एखाद जोडप हे आपल्या आईच्या शब्दासाठी प्रभू राम व्हायला देखील तयार होत आणि आपल्या पत्नीसोबत कोणी सीता सुद्धा होत म्हणूनच आज आम्ही आम्हाला भेटलेली माणसे कली युगातील तर राम सीता च समजतो आम्ही त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या रोडवर उभा राहूनच. इतके प्रगल्भ विचार एकूण मन सुन्न झाले. अहंकार गळून गेला. आणि वाटले की आपण उगाचच खोट्या फुशारकीवर जगतो. त्या व्यक्तीच्या बोलण्यातील सहजपणा बघून असे वाटल की, आपण या जगात शून्य आहोत.

हा पायी प्रवास बघून थक्क झालो. प्रवासाला निघून तीन महिने झाले आणि अजून घरी पोहचायला एक महिना लागेल. त्यांचे नाव डॉ. देव उपाध्याय व डॉ. सरोज उपाध्याय….. कलीयुगातील राम सीता…. आणि तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!