जेव्हा या आजोबांना कोरोना झाला तेव्हा पहा त्याच्या सख्ख्या मुलाने त्याच्या सीबत काय केले.. जाणून तुम्हाला धक्काच बसेल

वाघमारे भारत विठ्ठल चे नातेवाईक कुणी आहेत का? आवाज ऐकताच दिलीप आणि रमेश मागे झाले, जवळ-जवळ अर्धा तास सरण रचणारा महानगरपालिकेचा कर्मचारी आवाज देत होता. पण दिलीप आणि रमेश त्याकडे दुर्लक्ष करुन चाललेला सर्व प्रकार स्तब्धपणे पहात होते, हा सगळा प्रकार पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या स्मशानभूमी म्हणजे वैकुंड स्मशानभूमीत घडत होता. महानगरपालिकेचे दोन कर्मचारी मेलेली माणसं जाळण्याचे काम करीत होते. खरंतर महानगर पालिकेने नोटीस काढली होती की स्मशान भूमीतील कर्मचारी जर विनाकारण गैरहजर राहिले, तर त्यांना कामावरून काढण्यात येईल, त्यामुळे ते दोघेही महानगरपालिकेचे कर्मचारी.

नित्य नेमाने कामाला येत होते. तोंडाला रुमाल, हातात हात मोजे, डोक्याला टोपी, अंगात महानगर पालिकेचा कर्मचारी असल्याचा ड्रेस, असा त्यांचा पेहरावा होता. खरंतर काल परवाच त्यांना कोरोना वारियर म्हणून जवळच्या एका मंडळाने गौरवले होते. आणि त्यांच्याबरोबर फोटो काढून त्यांना प्रत्येकी पाच किलो तांदूळ, पाच किलो गहू, देऊन त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतला होता. नंतर त्या कार्यकर्त्यांनी फोटो सोशल मीडियावर टाकून बऱ्याच लाईक पण मिळवल्या होत्या, वाघमारे भारत विठ्ठल यांचे कोणी नातेवाईक आलेत का हे बघा बॉडी जड आहे, आणि आम्ही भी दोघच आहे. आम्हाला दोघांना उचलता यायचं नाही, फक्त सरणापर्यंत हात लावा बाकी.

काही करू नका, उचलताना मड खाली पडलं तर आम्ही जबाबदार नाही. उगाच मड्याची अशी हेडसांड करू नका, तो महानगर पालिकेचा कर्मचारी काकुळतीला येऊन आवाज देत होता, दिलीप आणि रमेश मात्र एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते, आणि जणू काही घडलंच नाही अशा अभीर भावात तंबाखूच बार मळत होते. वाघमारे भारत विठ्ठल म्हणजे 75 वर्षाचा म्हातारा माणूस, दिलीप आणि रमेश ही त्यांची दोन मुले.. भारत ला भारत मामा या टोपण नावाने सगळे ओळखत होते, आयुष्यभर जातीचे मेळावे भरविणे, वधू वर सूचक मंडळ चालवने, जातीचे मोर्चे काढने अशी कामे भारत मामा करत राहिला. तीन दिवसांपूर्वी त्याला ताप आला.

घसा दुखायला लागला आणि श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तसा आजूबाजूला शुकशुकाट झाला, करोना झाला का बघा बाबांनो….! शेजारपाजारचे बोलायला लागले, दिलीप मी दवाखान्यात फोन केला रमेश ने भारत मामा चे सगळं सामान गॅलरीत आणून टाकला. आणि पोरांना बजावून सांगितलं आजोबांकडे बिलकुल जायचे नाही, बघायचं पण नाही कळलं का रे पोरांनो….! ॲम्बुलन्स आता नाही सकाळी आली की पाठवतो, असे तिथल्या ऑपरेटरने सांगितले, तसं दिलीपच तोंड पडल त्यांनी ही गोष्ट रमेशला सांगितली. रमेश त्याला म्हणाला गॅलरीत सगळे सामान टाकले आहे. पाहिजे तर आपण दोघ भी अळी पळीने पहारा देऊ….

रात्रीचे जेवण सुनबाई नी खाली ठेवले, आणि कपडे वाळत घालायच्या काठीने भारत मामाकडे सरकवलं, तसा भारत मामा म्हणाला….! “अरे काय झालं नाही बघा मला उगाच परक्यासारखे वागू नका,” आणि हे भारत मामाचे बोलन एकाला देखील सुनबाईकडे वेळच नव्हता.. ती बोलणं पूर्ण व्हायच्या आतच निघून गेली. भारत मामा बिचारा तिथच झोपला दिलीप काठी घेऊन खुर्ची टाकून गॅलरीच्या तोंडावरच बसला होता, रात्री भारतमामाला स्वप्न पडलं एक महाराज स्वप्नात येऊन म्हणत होता, तू कितीही मोठा बंगला बांध तुझा शेवटचा मुक्काम गॅलरी तच असणार तसा तो खडबडून उठूला. रात्रीचे तीन वाजले होते, त्यानंतर भारत मामाला झोप लागलीच नाही.

सकाळी आठ वाजता सुनेने पुन्हा चहा आणला, आणि ती दिलीप ला म्हणाली काय हो कधी येणार आहे अंबुलन्स फोन करा परत त्यांना…. नंतर मला पाणी ठेव. असे भारत मामा बोलला, तुम्ही आता इथून हलायच नाही आणि काही बोलायचं पण नाही, आधीच तुम्हाला रोग झालाय आता काय आम्हाला भी लागण करणार का? सुनबाई बोलली….! भारत मामा गप्प बसला, सूनबाईणी चहाचा कप खाली ठेवला, आणि रात्रीच्या सारखेच काठीने पुढे सरकवला भारत मामाने चहा पिला, नऊ वाजता ॲम्बुलन्स आली तसेच भारत मामा रडायला लागला. गाडी बरोबर आलेल्या डॉक्टरने भारत मामा ला आत बसायला सांगितले, भारत मामा आत जाऊन.

बसला तसा धाडकन दरवाजा आपटला, आणि ॲम्बुलन्स धूळ काढत निघून गेली, इकडे भारत मामा निघून गेल्याबरोबर सगळ्यांच्या चेहऱ्यावर तेज निर्माण झाले. दुसऱ्या दिवशी भारत मामा गेल्या चा हॉस्पिटल मधून फोन आला कोरोनाचा रिपोर्ट अजून यायची आहे, तुमच्या घरचे आणि जवळचे नातेवाईक स्मशानभूमीत या तो हॉस्पिटल मधला ऑपरेटर बोलला. दिलीप आणि रमेश ने फोन कट केला, नंतर बाजूला गेले थोडावेळ कुजबुज केली, आणि परत घरात आले रमेश घरातल्या सगळ्यांना म्हणाला, मी आणि दादा दोघे वैकुंड स्मशानभूमीत जातो, तुम्ही कोणी येऊ नका शेवटचा तोंड तरी बघू द्या, भारत मामाची बायको बोलली तसच दिलीप.

डरडाऊन म्हणाला, काय तोंड बघायच नाही सगळे घरात बसा तसा तिने हंबरडा फोडला दिलीप आणि रमेश स्मशानात आले. वाघमारे चे नातेवाईक पुढे या कोणी कोणीही पुढे येईना.. त्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी कसाबसा तो मुद्दा उचलला, आणि त्यांची पावलं पुढे पडायला लागली जड असल्यामुळे बॉडी थोडी तिरकी झाली, आणि खाली पडणार इतक्यात एक म्हातारा पुढे आला त्याने थोडा हात लावला आणि तो मुडदा सरणावर ठेवला. तुम्ही वाघमारे चे नातेवाईक का?, तो महानगरपालिकेचे कर्मचारी बोलला.. तसे तो म्हातारा म्हणाला नाही बाबा, उगाच मेलेल्या माणसाची विटंबना नको म्हणून मी हात लावला, आणि आता 80 वर्षे झाल्यावर मला जगायची.

अजून इच्छा ती किती असणार…. म्हणून मी निडर पणे पुढे आलो.. सरणाला अग्नि पण त्या कामगारांनीच दिला, दिलीप आणि रमेश लांबूनच हात जोडले आणि कोणी बघत नाही हे पाहून लगेच काढता पाय घेतला आणि घरी आले. संध्याकाळी हॉस्पिटलचा माणूस घरी आला त्यांनी एक लिफाफा दिलीपच्या हातात दिला रमेश आणि दिलीपनी लागलीच तो लिफाफा फाडला आणि वाचला त्यात लिहिलं होतं, मृत्यूचं कारण हार्ट अटॅक….! मित्रांनो मार्च महिन्यापासून असंच वातावरण संपूर्ण भारतात तयार झालेले आहे सगळे नातेवाईक समाज एकमेकांपासून दूर गेलेले आहे इतके दूर की त्यांच्या अंतर्मनाचा आवाज देखील त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. मित्रांनो तुम्हाला याबद्दल  काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!