नातू रोज आजीच्या कुशीत झोपत असे पण, जेव्हा आजी वारली तेव्हा पहा त्याच्या सोबत काय घडले..

त्यांच्या बारा वर्ष्याच्या मुलाला प्यारासोमईस चा प्रॉब्लेम होता. झोप न येणं आणि आलीच तर मध्येच दचकून किंचाळत उठणं. झोपेत चालणं. वगैरे गोष्टी होत असत त्याच्या बाबतीत. डॉक्टरांची ट्रीटमेंट ही चालू होती लेकाला. परंतु त्या दोघांपैकी एकाला तर लेकाजवळ थांबावंच लागत असे. मग ते दोघे आळीपाळीन थांबत असत. कारण त्यांनाही दिवसा आड तरी झोप मिळणं आवश्यक होत. तर आज तो थांबलेला लेक मधेच दचकत होता. थरथरत होता. असबंध काहीसं बोलत होता. लेकाचा डोक्यावरून, छातीवरून हात फिरवत बसला होता तो. लेकाचा अस्वस्थता चुळबूळ मात्र थांबायचं नाव घेत नव्हती. खूप वाईट वाटत होत त्याच त्याला. आपल्या लेकाचा ही अवस्था बगून.

त्याने लेकाच्या उशी खाली ठेवलेल्या पुढितील अंगारा त्याच्या कपाळाला लावला. डोळे भरून आले होते त्याचे इतक्या लहान वयातच त्याच्या जिवाच्या तुकड्याला होणारे कष्ट बगून त्याने डोळे बंद करत त्याने हात जोडले समोर भिंतीवर असलेल्या देवाच्या फोटोला. डोळे उघडले आणि त्याचा अचानकच लक्ष गेलं, भिंतीवर बाजूलाच काही अंतरावर असलेल्या त्याच्या आईच्या फोटोकडे. त्याचे हात जोडलेले होतेच त्याने डोळे मिटत त्यांच्या गेलेल्या आईचही नामस्मरण केलं. आणि आईकडे बगतच डोळे उघडले त्याने जोडल्या हातानेच त्याचाही नकळत तो बगत राहिला फोटोतील आईकडे अन अकस्मातच कुठलासा प्रखर उजेड आला त्याच्या डोळ्यावर आरश्याच्या तुकड्यावर.

उन्हाची तिरप पडून तो येक कवडसा येतो डोळ्यावर अगदी तसा. त्याने उस्फुर्त पणे डोळ्यावर उपडा हात नेला स्वतःचा, कमालीचं आश्चर्य वाटलं होत त्याला. की रात्रीचे बारा वाजून गेल्या नंतर ही हा इतका उजेड कुठून आला. आणि अचानक त्याला काहीतरी आठवलं रक्ताभिसरण वाढलं त्याच हातापायांना किंचीतसा कंप फुटला. त्यानं चमकून पाहिलं त्याच्या आईच्या फोटोकडे एकदा उपाय सुचल्यावर, होणार आपण त्याला तो कळलंय का याच अंदाज घेत बगत असतो. त्याच्याकडून येणाऱ्या प्रतिसादाच्या अपेक्षेत. तसा भासला होता त्याला त्याच्या आईचा फोटोतील चेहरा तेव्हा. तो खाडकन उठून उभा राहिला जागेवर अन झपाझप पावले टाकत त्याच्या बेडरूममध्ये गेला.

दिवा लावला त्याने आणि बायकोला न उठवता तीच कपाट हळुवार पणे उघडलं बायकोच्या ह्यांगरला लावलेले कपडे तपासले त्याने. मग घडी घालून बाजूला ठेवलेले कपडे तपासले त्यानंतर खालच्या खणात ठेवलेल्या फोल्डर्स कडे त्याच लक्ष जाऊन त्यानं दोनी फोल्डर्स तपासले त्याने आणि अखेर मिळाली त्याला ते जो तो शोधत होता इतक्या उतावीळ पणे. त्याने हातात घेतलं ते ते पळत पुन्हा लेकापाशी आला. लेक अजूनही थरथरत होता. अस्पष्ट अस बडबडत होता. त्यानं क्षणाचाही विचार न करता लेकच्या अंगावरच पांघरून दूर केलं आणि पांघरल त्यानं लेकाचा आंगावर त्याच्या आईच एक साधं सूद काठच एक पातळ अगदी काही क्षणच जोराची हुडहुडी.

भासल्यासारखं झालं लेकाला . आणि मग एकदम शांत झाला तो. वारा नसल्याने एक पानं न हलणाऱ्या एकाद्या झाडासारखा त्याने हात ठेवला लेकाच्या छातीवर आणि आज बऱ्याच दिवसानी त्याला लेकाच्या हृदयाची धडधड एका समान जाणवली. बऱ्याच महिन्यांनी त्याचा लेक आज शांत निवांत झोपला होता. डोळे वाहू लागले त्याचे आनंदाने त्याच्या नकळत मागे उभं राहिलेल्या आणि सर्व बघितलेल्या तीचेही डोळे वाहू लागले होते. ती बसली त्याच्या बाजूला त्याच्या खांद्यावर डोकं टेकत बोलली तुही झोप आता शांत झोपलाय आपला लेक त्याच्या आजिच्या मांडीवर त्या मांडीवर हळुवार थोपट त्याला नाही जाणार आता झोप त्याची कारण जगातील कुठलीही शक्ती.

कोणाही आईला तिच्या मर्जी विरुद्ध कधीही हरवू शकत नाही. तो हसला तिच्याकडे डोळे पुसत आणि लेकाला कवेत घेऊन निजला तीच साडी जराशी स्वताचाही अंगावर घेत तिहा उठली साडी वरून आईच्या फोटोला नमस्कार केला तिने आणि खोलीतला दिवा घालवला त्या पूर्णतः अंदार भरून आलेल्या खोलीतही तिला उजडुन आलेलं दिसत होत आईच ते मऊशार पातळ अदृश्य आईच्या कृपेमुळे.. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!