डॉक्टरांनी या स्त्रीचे गर्भाशय काढले म्हणून हिने असे काही केले की पाहून तुम्हाला..

नमस्कार, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक हृदयस्पर्शी कथा. आणि लेखन केले आहे आदरणीय स्वप्ना…. यांनी.  “तिने सगळ्या गोळ्या दिला,.. ड्रेसिंग करायला घेतलं तसं काकु चिडचिड करत होत्या,..आपला एक अवयव काढावा लागला ह्याच खुप मानसिक त्रास स्वतःला करून घेत होत्या आणि दुसऱ्यावर चिडत देखिल होत्या,..” माझ्या डिलिव्हरी नॉर्मल आहेत ग आणि ह्या वयात कशाला हि चिरफाड,…म्हणे सीझर करून गर्भाशय काढावं लागलं,..अरे माझ्या आईपणाची सुंदर जागा आहे ती,..घरटं आहे ते,…” काकूंना जरा रागवाव लागेल हे शरूने ओळखलं,..”काकु ,..अहो या वयात आईपण आणि गर्भाशय काही संबंध नाही ,…उगाच त्रास करून तब्येत बिघडवू नका.

आईपण किती वेगवेगळ्या तऱ्हेने जगतो आपण,…आधी ती नाळ असते तोपर्यंत गर्भाशयाशी काम नंतर,… दूध पाजण,खेळवण, खाऊपिऊ घालणं,…ते तर खरं आईपण हे काय गर्भाशय काढलं त्याच फार मनावर घेऊ नका ते ठेवलं असतं तर धोका होता,..सानेकाकु वृद्धाश्रमात राहतात हे सांगितलं होतं डॉकटरांनी,..थोडया मानसिक त्यामुळेच डिस्टर्ब आहेत हेही जाणून होती शरू,..ती बाकी मुलांचा विषय काढत नव्हतीच पण काकुच म्हणाल्या,”जे ह्या घरट्यात राहिले त्यांनीच आम्हाला घरट्याबाहेर ठेवलं खरं कशाला मी तरी मनाला लावते बर झालं,..त्यांच घरटं शरीरातून खुरडून टाकलं तेच,.. “शरूला एकदम वाईट वाटलं,..काकूंची चिडचिड योग्यच होती,..पण आता आपण ह्या.

नकारात्मक घटनेला साथ दिली तर काकु निगेटिव्ह विचार करतील त्यापेक्षा आपण नवीन विचार देऊ काकूंना,…शरू म्हणाली,” काकु अहो गर्भाशयात राहणं हि नैसर्गिक क्रिया आहे मुलांची,.. पण खरी घडण आई बाहेर आल्यावर करते ना,..?”काकु म्हणाल्या,” हो ग बाई,…” शरू म्हणाली,”मला काय वाटतं काकु आपण संस्कार करावे पण ते कसे वागतील हे त्यांच्यावर सोडावे उगाच अपेक्षा भंग नको आपला,..पंख आले ते उडणार हे एकदा समजावू मनाला नाही का?,.. काकु तुम्ही मोबाईल वापरता ना,…?? काकु म्हणाल्या ,”हो तर तुला फेसबुकला रिकवेस्ट दिली आहे,..” शरु म्हणाली,”मी एक रिक्वेस्ट करते,.. माझी ह्या नर्सच्या नोकरीत मुलांकडे बघताना हेळसांड होते तुम्ही.

रोज रात्री ऑनलाईन माझ्या मुलाला गोष्ट सांगा,.. मी तुम्हाला यु ट्यूब चॅनल काढून देते आणखी चार मुलांना गम्मत वाटेल,.. काकु ह्या नर्सच्या क्षेत्रात आले आणि जगणं समजलं हो,.. क्षण आपला आहे,.. नुसतंच लेकरंबाळ ह्यात अडकून नाही घालवायचं आयुष्य,… एक ध्येय चूल आणि मुल शिवाय देऊन ठेवायचं मनाला,.. त्यांच संगोपन हे कर्तव्य पण त्यांना कळेपर्यंत नंतर आपली वाट असावी ठरवलेली,… आता ह्या क्षेत्राने बघा कसं हे शिकवलं,” अहो,.. रुग्णांशी आठ दिवसात नाळ जुळते आणि रुग्ण बरा होऊन गेला की कुठे फिरकतो इकडे,..? अर्थात त्याने फिरकू नाहीच पण त्यातून तर शिकता आलं जगणं,…. पुढच ध्येय समोर असलं कि मागच विसरता येतं कि कधीतरी.

आठवण काढावी बस इतकं,.. उकरून जखम होईपर्यंत अट्टहास नको ना,..?” एवढं बोलून परत ड्रेसिंग कडे वळत शरु हसत म्हणाली,” साने काकु आता खुप सुधारणा झाली आहे तुमच्या तब्येतीत,..”तेवढ्यात डॉकटर राउंडला आले,….शरू नर्स ड्युटीवर असली कि फार काही पहायची गरज नाही आम्हाला हो ना शरू,….? शरू तिकडे टेबलखाली काहितरी करत होती तिकडूनच म्हणाली,..येस थँक्स सर तुम्ही सगळं शिकवलं नुसता कोर्स करण्यापेक्षा फिल्डवर काम करणं वेगळं आहे हे,..माणसं जगायची आणि जगवायची कशी हे प्रत्यक्ष तुम्ही समजावलं म्हणून तर जमत सगळं ..त्यावर डॉकटर म्हणाले,” आम्ही नाही ग ..तुम्हा नर्स लोकांमध्ये असतोच तो रुग्णांशी.

जोडल्या जाण्याचा दुवा,..तो वापरा नीट हेच तर शिकवलं,..,…” डॉकटरने साने बाईंचे टाके बघितले,..एके ठिकाणी जरा जखम खोल जाणवत होती इथे आणखी क्रिम लाव हे बघ इथे म्हणत त्यांनी हाताने शरूला बोलवलं,.. शरू जरा गडबडली पण टेबलावरचा कागद लावलेला पॅड घेऊन डॉक्टरांजवळ आली,… साने बाईंचं लक्ष होतं ती जरा गडबडल्यासारखी वाटली,..गेल्या दोन दिवसात सानेबाई तिला चांगल्या ओळखायला लागल्या होत्या,… कुठली चिडचिड न करता शांतपणे सेवा करणारी हि नर्स त्यांना आवडलीच होती,… आणि डॉकटर परिचयातले असल्याने त्यांनी पहिल्यांदाच सांगुन टाकलं होतं साने काकुकडे शरू तुझी ड्युटी असेल,… इमर्जन्सी आली तरच तू तिकडे ये.

ड्रेसिंग वगैरे तूच कर जरा जास्त वेळ लागला तरी थांब पण लक्ष दे तूच त्यांना जरा समजावून सांग जगण्याच्या बाबतीत फार निराश आहेत ,..”काकूंना वाटलं मघाशी किती फ्रेश होती आणि आता का हि एकदम अशी गडबडल्यासारखी झाली,..?डॉकटरांनी तिला टाका दाखवला ,…आणि त्यांनीही तिच्या हातातल्या पॅडकडे बघत हसत विनोद केला,”अग आता नवीन प्रिस्क्रिप्शन लिहायला नाही बोलवलं मी तुला,..तिला समजलं पण तिने बेंगरुळ हसत वेळ घालवली,..” डॉकटर गेले तसे तिने पटकन खोलीचं दार लावलं,…पॅड टेबलावर ठेवला,… तिचा ड्रेस समोरून पूर्ण ओला झाला होता,…सोबत आणलेल्या बॅगमधील ड्रेस घेऊन तो पडद्यामागे जाऊन बदलताना ती बोलू लागली.

“काकु जे गर्भाशय तुम्हाला गाठ झाल्यामुळे काढावं लागलं ह्या वयात तरी तुम्हाला दुःख झालं,…माझी तर ओळख झाली आहे त्या दुसऱ्यांदा या गर्भाशयाची,…अहो मी चार महिन्याची बाळंतीण आहे,..ठराविक वेळे नंतर पान्हा फुटतो आज तुमच्या ड्रेसिंगमुळे थांबले होते,…नेमके डॉकटर आले,… असो… ” हे रोजचंच म्हणत ती पटकन काकु जवळ अली,..त्या टाक्यावर क्रिम लावून सगळं नीट करून,.. काकुला म्हणाली “निघते,.. उद्या भेटू,..” निराश झालेल्या काकुला नव्याने उभारी अली,.. खरंच गर्भाशय हरवलं म्हणून आईपण थोडीच गेलं आणि हि नर्स तर तिच्या बाळासोबत आपली आई झाली,… रात्री काकूंनीच शरूला व्हिडीओ कॉल केला,.. मोठ्या मुलाला बघितलं.

छोट्याला बघितलं आणि त्यांचे डोळे भरून आले,….त्या म्हणाल्या,”शरू अग आमच्या सारख्या रुग्णांना चांगलं करण्यासाठी इतकी चिमुकली सोडून येता ग तुम्ही,..” त्यावर शरू म्हणाली,”काकु उबदार घरट्याची गरज ठराविक वयाची ती आपण ओळखावी बाकी आपण आपलं जगणं इतरांना ऊब देण्यात घालवाव नाही का,..?”काकु गोष्ट सांगू लागल्या तिच्या मुलाला तशी ती म्हणाली,” थांबा मी आणखी मुलांना जोडते गोष्टीत,..”तो एकत्र कॉल गोष्टीत रंगला आजची गोष्ट होती “शरूनर्स”….नवीन ध्येयात काकु घरट्याच्या जख्मा विसरल्या होत्या,… आणि तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!