स्वामी म्हणतात ही एक वस्तू रात्री घरात ठेवल्याने अफाट पैसा येतो..

नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो घरात कोणती गोष्ट ठेवल्याने सुख शांती समाधान आरोग्य नांदते. हिंदू धर्मात घरात कासव ठेवणे हे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार विष्णूचे एक रूप कासव होते. श्री विष्णूंनी कासवाचे रूप धारण करून समुद्रमंथम दरम्यान मद्रानचल पर्वत आपल्या कवचावर सांभाळला होता. जिथे कासव असते तिथं लक्ष्मीचा वास असतो. अस म्हंटले जाते. वास्तुशास्रात घरात कासव ठेवणे शुभ मानतात. घरात आणि ऑफिस मध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहावा म्हणून कासव ठेवणे गरजेचं आहे. परंतु याचा लाभ तेव्हाच होतो जेव्हा कासव योग्य दिशेला ठेवलं असेल. नाहीतर अशुभ परिणाम हाती लाघु शकतात. कासव ठेवल्याने धनप्राप्ती होते.

धनासबंधीत समस्या कासव ठेवल्याने दूर होते. परंतु या सर्वांसाठी क्रिष्टल कासव उत्तम मानले गेलेलं आहे. तसेच कासव ठेवल्याने कुटूंबातील लोकांना दीर्घायुष्य प्राप्त होते. आणि आजारपणापासून मुक्ती देखील मिळते. कासव ठेवल्याने नोकरी आणि परीक्षेत यश हाती लागते. कासव आपल्या कुटूंबाला वाईट नजरेपासून देखील वाचवते. याने घरात सुख शांती समाधान आरोग्य नांदते. नवीन व्यापार सुरू करताना दुकान किंवा ऑफिस मध्ये चांदीचे कासव शुभ मानले गेलेलं आहे. याने जीवनात ऊर्जेचा प्रभाव वाढतो. वास्तुशास्त्रानुसार ऑफिस किंवा घराच्या मागील भागात कासव ठेवल्याने अपार ऊर्जा जानवते. आणि आपले सर्व कार्य योग्य रित्या पार पडते. करियर मध्ये उन्नती साठी.

काळ्या रंगाचे कासव उत्तर दिशेस ठेवतात. व्यवसाय वाढल्याने करियर प्रगतीच्या दिशेने वाढते. घरातील मुख्य दाराशी पश्चिम दिशेला विशेष कासव ठेवल्याने सुरक्षा मिळते. कासव हे गुडलक साठी सुद्धा ठेवण्यात येते. पाठीवर पिल्लू असलेली माधा कासव ठेवल्याने दाम्पत्याना संतान सुख मिळते. क्रिष्टल ने निर्मित कासव दक्षिण पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेस ठेवावे. लाकडाने निर्मित कासव पूर्व किंवा दक्षिण पूर्वेस ठेवावे. कासव घरातील लिविंग रूम मध्ये ठेवल्याने घरातील सदस्यांच आपापसात प्रेम वाढते. धातू निर्मित कासव उत्तर आणि उत्तर पश्चिम दिशेस ठेवावे. आणि मिश्रितधातू निर्मित कासव उत्तर दिशेला ठेवणे योग्य मानले जाते. तसेच कासवाचे तोंड नेहमी पूर्वेकडे असावे.

ही दिशा शुभ मानली गेलेली आहे. कासव नेहमी पाण्यात ठेवावे. कासवाला धातूच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे. ज्याने घरात सुख समृद्धी आरोग्य नांदते. तसेच धातू किंवा तांब्याचे कासव पौर्णिमेला खरेदी करून आणावे. नंतर कच्या दुधात बुडवून ठेवावे. शुभ मुहूर्त बघून कासव दुधातून बाहेर काढावे. स्वच्छ पाण्याने धुहून घ्यावे. नंतर तांब्याच्या किंवा काचेच्या बाउल मध्ये पाणी टाकून त्या मध्ये कासव स्थापित करावे. यासाठी घरातील उत्तर पूर्व कोपरा शुभ मानला गेला आहे. तर मित्रांनो अश्या प्रकारे एक कासव आपल्या आयुष्यात सुख शांती समाधान आरोग्य पैसा यश प्राप्ती आणू शकते. मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल ते कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!