गुपचूप करा फक्त हे ५ चमत्कारी टोटके, रातोरात धनवान बनाल..

नमस्कार मित्रांनो. आज आपण अचानक धनप्राप्तीचे पाच चमत्कारिक तोटके पाहणार आहोत. तोटका म्हंटले की लोकांना भीती वाटते. खरंतर तोटका या शब्दाचा अर्थ की असा उपाय की ज्यासाठी कमीत कमी सामग्री लागते. आणि जो खूप लवकर फलदायी होतो. म्हणजेच त्याच फळ आपणास तात्काळ मिळते. मित्रांनो कोणताही तोटका हा गुप्त ठेवावा लागतो. अगदी त्याच प्रमाणे जे पाच तोटके पाहणार आहोत की जे आपल्या जीवनात धन आगमन करवतील हे तोटके सुध्दा आपण गुप्त ठेवा. त्याबद्दल कुठेही वाच्यता करू नका. शक्य असेल तर आपल्या घरात सुद्धा आपण हे तोटके का करत आहोत कश्या करता करत आहोत याबद्दल वाच्यता करू नका.

कारण बरेचसे तोटके दुसऱ्यास समजल्यामुळे निश्फल ठरतात. त्याच फळ मिळत नाही. मित्रांनो पैश्याच महत्व तुम्हाला चांगलेच माहीत आहे. आजच्या युगात जर पैसा असेल तर मानसन्मान मिळतो अगदी लांबलांब चे नातेवाईक सुद्धा आपुलकी दाखवतात. आणि म्हणून पैसा कमावणे ही आज काळाची गरज बनलेली आहे. या कलयुगात पैसाच फार महत्त्व आहे. आणि म्हणून अनेक लोक नोकरीच्या शोधत असतात. जॉब मिळवू इच्छितात. जर आपणही पैश्याच्या मागे असे धावत असाल मात्र जर पैसा तुमच्याकडे येत नसेल तुमच्या घरात पैसा टिकत नसेल तर लक्ष्मी प्राप्तीसाठी अचानक धन प्राप्त करण्यासाठी हे पाच उपाय आपण आवर्जून करा.

जितके करता येतील तितके करा. मित्रांनो जाणून घेऊयात यातील पहिला तोटका कोणता आहे. मित्रांनो पहिला उपाय माता लक्ष्मीस प्रसन्न करणारा. तसं तर पैसा म्हणजेच लक्ष्मी आणि लक्ष्मी म्हणजेच पैसा. ज्या व्यक्तीवर लक्ष्मीची कृपा बरसते. त्या व्यक्तीच्या जीवनात पैसा येतोच. आणि म्हणून माता लक्ष्मीस प्रसन्न करणारा पहिला उपाय. हा तोटका नित्यनियमाने करायचा आहे. केवळ स्त्रियांना महिन्यातील जे पाच दिवस असतात. ज्याला आपण मासिक धर्म अस म्हणतो. केवळ ते पाच दिवस वगळता दररोज नित्यनियमाने हा उपाय आवश्य करावा. मित्रांनो माता लक्ष्मीस प्रसन्न करण्यासाठी जेव्हा आपण सकाळी देवपूजा करतो त्यावेळी माता लक्ष्मीच्या चरणी.

कोणतेही लाल रंगाचे फुल त्यातल्यात्यात गुलाबाचे फुल असेल तर अतिउत्तम. कमळाचे असेल तरीही चालेल. आणि सोबतच नैवद्य म्हणून आपण दुधाचा कोणताही पदार्थ मिठाई ही नक्की अर्पण करावी. जर आपण दररोज नित्यनियमाने हा उपाय केलात तर मित्रांनो लक्ष्मीची कृपा नक्की बरसते. आणि ज्या लक्ष्मीवर व्यक्ती प्रसन्न होते. अगदी रणकाचा सुद्धा राजा बनतो. म्हणजेच भिकार्याचा सुद्धा राजा बनतो. नित्यनियमाने करा. एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो ज्याचा देवावर विश्वास नाही त्यांनी हे तोटके हे उपाय चुकूनही करून पाहू नका. जोपर्यंत तुमच्या मनात श्रद्धा नसेल विश्वास नसेल. तोपर्यंत तुम्हाला याचं फळ मिळू शकत नाही. दुसरा उपाय आपण पाहू.

मित्रांनो तुम्ही शहरात राहत असाल किंवा गावात राहत असाल. आपल्या आजूबाजूला वडाच झाड असतेच असते.असे हे वडाचे झाड हिंदुधर्म शास्त्रात फार पवित्र फार महत्वाचे मानण्यात आलेले आहे. मित्रांनो वडाच्या झाडाशी संबंधित हा उपाय आहे. हा उपाय केल्याने अचानक धनप्राप्ती होते. अचानक कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्या जीवनात पैसा आवश्य येतो. आपल्याला हे करायचे आहे. वडाच्या झाडाजवळ जाऊन चप्पला काढायच्या आहेत. मनोभावे वडाची जी पारंबी असते तिला एक गाठ मारायची आहे. एक गाठ मारायची आहे. आणि एक गाठ मारताना आपली धन संबंधी ची जी इच्छा आहे. मग तुम्हाला नोकरी नसेल तर नोकरी लागावी यासाठी.

किंवा कोणत्याही मार्गाने पैसा आपल्याकडे यावा अश्या प्रकारची इच्छा बोलुन एक गाठ मारायची आहे. त्यानंतर मनोभावे वडाच्या झाडास नमस्कार करून पुन्हा आपल्या घरी परत यायचे आहे. मित्रांनो हे सर्व करत असताना हे कुणी पाहणार नाही कुणाचे आपल्याकडे लक्ष नसेल याची मात्र काळजी आवश्य घ्या. कारण हा तोटका आहे तो गुप्त ठेवावा लागतो. कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा आपल्याकडे येऊ लागेल. मित्रांनो हा उपाय आपण शुक्ल पक्षातील पहिल्या शुक्रवारी करायचा आहे. आणि सलग तीन शुक्रवार हा उपाय करायचा आहे. जेव्हा सायंकाळ च्या वेळी सूर्य मावळू लागेल तेव्हा आपण लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात जा लक्ष्मीनारायणाचे मंदिर जर.

नसेल तर लक्ष्मीच मंदिर असेल तर त्यात जा. त्या मंदिरात जाऊन मातेचे पूजा करा आणि त्या मंदिराच्या जवळ जी एकादी कन्या असेल तिला सोबत आणलेली खीर असेल किंवा खडीसाखर तिला खायला द्यायची आहे. आणि सोबतच एक लाल रंगाचे चमकदार वस्त्र भेट म्हणून द्या. मित्रांनो कोणतीही कन्या जीच वय आठ ते दहा या आतील असावे. तीन शुक्रवार हा उपाय करल्यानं अचानक धनप्राप्ती होऊ लागते. मित्रांनो एक उपाय सोमवार साठी. मित्रांनो आपल्या गावा भोवती शहरा भोवती जी स्मशान भूमी असेल. कधीकधी एकाढ्या स्मशानभूमी च्या शेजारी महादेवाचे मंदिर बांधले जाते. अस महादेवाचं मंदिर जे की स्मशाना जवळ आहे.

तर त्या ठिकाणी आपण जायचं आहे. तर सोमवारचा प्रदोष काळ म्हणजे जेव्हा सूर्य बुडू लागेल तर सूर्य बुडण्यापूर्वी आपण हे करायचं आहे. मात्र सूर्यास्त संपण्यापूर्वी हा उपाय करून आपण घरी या. जास्त वेळ मंदिरात थांबू नका. तर आपण त्या ठिकाणी जायचे आहे आणि त्या शिवलिंग असेल तांब्या भर गोमातेच दूध टाकायचे आहे. सोबतच चमचा भर मध आपण त्यात टाकायचा आहे. आणि असे हे जल दूध आणि मध मिश्रित हे जल शिवलिंगा वर मनोभावे अर्पण करत. “ओम नंम शिवाय, ओम नंम शिवाय, ओम नंम शिवाय,” या महा मंत्राचा जप करायचा आहे. महिला जर असतील तर त्यांनी “नंम शिवाय, नंम शिवाय” या मंत्राचा जप करायचा आहे.

आणि भगवान भोळेनाथकडे प्रार्थना करायची आहे की आपल्या जीवनात जी काही गरिबी आहे दरिद्री आहे. तर या समस्या दूर कराव्यात. आपली इच्छा त्या ठिकाणी बोलून दाखवा आणि परत या. भोलेनाथ अत्यंत दयाळू आहेत. मित्रांनो हा छोटा उपाय या इच्छा पूर्ण नक्की करतो. हे छोटे आणि सोपे उपाय नक्की करा. मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल ते कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!