घरामध्ये गरिबी, आजारपण, आणि सारखे भांडण होत असेल तर दरवाजा जवळ ठेवा फक्त ही १ वस्तू..

नमस्कार. आजच्या या लेखात आपल्या घरातील रोगराई, आपल्या घरातील दैन्याअवस्था, गरिबी दारिद्र्य. जे दुर्भाग्य आपल्या नशिबात आहे या सर्वावरचा रामबाण तोटका या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. विनंती आहे उपाय केवळ वाचत जाऊ नका. उपाय करून पहा. फरक नक्की जाणवतो. अनेकजण अस म्हणतात की आमची खूप शेती आहे. पण पीक पाणी चांगला येत नाही. मित्रांनो कोणताही कार्य असो यातून जर लक्ष्मी प्राप्त करायची आहे. तर आपण परिश्रम कष्ट तर करायलाच हवेत. सोबतच हे तोटके सुद्धा करून पहा. आमचा अजिबात दावा नाही की केवळ हे तोटके उपाय करूनच लक्ष्मी प्रसन्न होते. लक्ष्मीला परिश्रम कष्टाची जोड द्यावीच लागते.

जाणून घेऊयात की लक्ष्मीला प्रसन्न करणारा आणि घरात सुख समृद्धी आरोग्य नंदवणारा हा उपाय कोणता आहे. मित्रांनो जेव्हा जेव्हा तुमच्या दारात घरासमोर एखादा भिकारी येईल. याचक येईल त्याला अन्नदान करा. तुम्ही पैसे तर त्याला द्याच सोबतच अन्नदान करा. त्याला जेऊ घाला. अन्नदानासारखे दुसरे पुण्य नाही. कारण जो अन्न ग्रहण करणारा जो मनुष्य असतो तो अन्न ग्रहण केल्याने संतुष्ट बनतो त्याचा आत्मा तृप्त होतो. आणि मनापासून त्या व्यक्तीचे आशीर्वाद आपल्याला लागतात आपल्या कुटूंबाला लागतात. आपल्या कुटूंबात आपण पूर्वजन्मी पापकर्म केली असतील. ती जर धून काढायची असतील तर हा सर्वोत्तम मार्ग आहे.

अन्नदान करा जास्तीत जास्त करता येईल तितका करा. मित्रांनो दुसरी गोष्ट दोष दूर होतील सोबतच दररोज आपल्या घराच्या मुख्य दरवाजापाशी दोन्ही बाजूला उजव्या किंवा डाव्या बाजूला सायंकाळ होताच मोहरीच्या तेलाचा दिवा लावायला विसरू नका. मोहरीचे तेल म्हणजे काय सरसोका तेल अस देखील म्हणतात. तर या मोहरीच्या तेलाचे दिवे दोन्ही बाजूला लावा किंवा एका बाजूला लावा. दररोज लावा. आता दिवा दारात लावल्यावर विजणार आहे. दिवा विजल्यांतर त्यातील जे तेल उरलेले असेल. हे तेल दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पिपळाच्या झाडाच्या बुंध्यावर टाका. खोडावर टाका. मित्रांनो हे जे कार्य मी तुम्हाला करायला सांगतोय हा एक तोटका आहे.

आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावलेला दिवा विजल्यावर त्या दिव्यातील उरलेलं तेल जेव्हा आपण पिपळाच्या वृक्षावर टाकतो. दुसऱ्या वाटीत घ्या ते पिपळाच्या वृक्षाला अर्पण करा. मित्रांनो घरात धनाची वाढ होते. घरात पैसा वाढू लागतो. तुम्ही स्वतः अनुभव घेऊन पहा. आणि जेव्हा तुम्ही अश्या प्रकारे या पिपळाच्या झाडाच्या ठिकाणी ते तेल ओतणार त्याच वेळी आपण पिपळाच्या झाडाच्या मुळा मध्ये मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा. आणि मागे वळून न पाहता तसेच घरी या. मित्रांनो धन लाभ प्रचंड गतीने वाढू लागेल. या पिपळाच्या वृक्षाचे हिंदुधर्मशास्त्रात फार मोठं महात्म्य सांगितलेले आहे. सर्व देवी देवतांचा या पिपळाच्या वृक्षात वास आहे.

या संपूर्ण जगताचे पालनपोषण जे भगवान श्रीहरी श्री विष्णू करतात. त्याचा वास या पिपळाच्या वृक्षात आहे. आणि म्हणूनच धनलाभ होण्यासाठी आरोग्याच्या समस्या सुटण्यासाठी हा छोटा उपाय खूप जास्त मदत करतो. मित्रांनो हे झाले काही छोटे छोटे उपाय. कधी कधी पैसा आपल्याकडे येऊ लागतो. आणि त्यानंतर आपण उन्ममत होतो. तर अस होऊ नका. उतू नका मातू नका. आलेला पैसा स्थिर जर ठेवायचा असेल लक्ष्मीला जर स्थिर करायचे असेल. तर नक्की काय करायचे. लक्ष्मी तुमच्या घरात येईल तिचा वावर सर्वत्र होईल. तुमच्या घरात होईल अगदी सर्वजण आनंदात असतील अश्या वेळी लक्ष्मील स्थिर करण्यासाठी जी लक्ष्मी आपल्या.

घरात सोन पावलांनी आलेली आहे तिला स्थिर करण्यासाठी आणि आकस्मिक खर्च येऊ नयेत अनावश्यक खर्च होऊ नये अस जर वाटत असेल तर दुर्गा सप्तष्ठीचा पाठ करीत चला. अनेकाना वाटेल की आपण हे वाचन करू शकणार नाही काळजी करू नका. तुम्ही तुमच्या मोबाईल वर लावू शकता. अनेकजण महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करतात. तुम्ही सुद्धा करा. मार्गशीर्ष महिन्यात हे व्रत केले जात. किंवा तुम्ही वैभव लक्ष्मीचे व्रत करू शकता. आपण अकरा शुक्रवार केले तरी चालतील. महिलांनी सकाळी उठल्यावत घरासमोर सडारांगोळी करावी प्रसन्न वातावरण करावं. सकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यानची वेळ माता लक्ष्मीची आपल्या घरात येणायची वेळ असते.

पवित्र वातावरण बनवावे. लक्ष्मीगायत्रीचा मंत्र असेल या मंत्राचा एकशे आठ वेळा आपण जप करा. ” ओम महालक्ष्मीचे विदमहें विष्णू पत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मीच प्रचोदया.” माता लक्ष्मीना प्रसन्न करणारा हा मंत्र आहे. रोज एकशे आठ वेळा जप करा. आणि लक्ष्मीचा स्थाई वास सुद्धा आपल्या घरात निर्माण होईल. करून पहा. माता लक्ष्मीच्या आणि भगवान श्री विष्णूच्या कृपेने तुमच्या घरात सुख समृद्धी नांदो याच मनोकमनेसह आम्ही थांबत आहोत. धन्यवाद. मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल तर तुमच्या एक तरी मित्राला ही पोस्ट नक्की शेअर करा आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!