
फक्त हा घरगुती उपाय करा व दातांची किड घालवा. आज आम्ही आपल्यासाठी दातांच्या काही समस्या असतील, जसे किड लागणे, तसेच दातांना जो पिवळेपणा आला असेल,तर दात मोत्यासारखे चमकदार करून देणारा घगुरती उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या दातांची किड तर निघून आहे आणि दात पांढरे मोत्यासारखे पांढरे देखील होतील. या उपायासाठी आपण घेणार आहोत बारीक मीठ, साधारण अर्धा चमचा मीठ घ्यायचे आहे. मिठामुळे जर तोंडामध्ये काही जीव जंतू असतात तर ते निघून जातात.
यातला दुसरा पदार्थ म्हणजे हळद, हळद ही आपली घरची वापरायची आहे. अर्धा चमचा हळद आणि बेकिंग सोडा , हा वापरताना फक्त चुटकीभर वापरायचा आहे. आणि या मिश्रणामध्ये लिंबू चा रस टाकायचा आहे. आणि हे छान मिक्स करून घायच आहे. ही तयार झालेली पेस्ट ज्या व्यक्तींना दाताला पिवळेपणा आलेला आहे. अश्या व्यक्तींनी ब्रशवर ही पेस्ट घ्यायची आहे व दात स्वछ घासून घ्यायचे आहेत. हा जर तुम्ही सलग आठ दिवस केला तर तुमचे पांढरे होतील. आणि याबरोबरच तुमच्या दातांना किड लागली.
असेल तर दोन ते तीन लवंग घ्यायची आहे. आणि एक चमचा राईच्या तेलामध्ये ही छान गरम करून घ्यायची आहे. आणि गरम करून घेतलेली ही लवंग ज्या ठिकाणी तुम्हाला किड लागलेली आहे. त्या ठिकाणी अलगद ठेऊन द्यायची आहे. आणि ते तसेच पाच मिनटे ठेऊन द्यायचे आहे.