फक्त या उपायाने गजकर्ण व टांगाजवळील खाज एका झटक्यात कमी होईल..

खाज , खरूज, नायटा, यांच्यावर घरच्याघरी करा उपचार. आपण आपल्या शरीरावर फंगल इन्फेकशन मुळे होणारी खाज दुर्लक्षित केल्यावर याचे रूपांतर नायटा, खरूज व गजकर्ण यामध्ये होते. आणि याचे प्रमाण हल्ली इतकं वाढले आहे की दहा पैकी 2 ते 4 लोकांना ही समस्या पाहायला मिळते. अनेक वेळा गजकर्ण, आणि गुप्तांगावरची खाज सहनही होत नाही आणि सांगता ही येत नाही. आणि याकडे दुर्लक्ष करत राहिल्यास कुटुंबात ती सर्वत्र पसरत जाते. खरूज नायटा गर्जकर्ण या समस्या उन्हात जास्त काम केल्याने शरीरातून येणार घाम सुकून शरीरावर जास्तवेळ राहिल्याने किंवा अश्या रोगांच्या संपर्कात आल्याने या समस्या होतात.

पण मित्रानो हो खाज, खरूज, नायटा, गजकर्ण कितीही जुना असल्यास तो या उपायाने निघून जातो. हा उपाय बनवण्यासाठी आपण येथे घेणार आहोत , कार्ले , कार्ले आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करून त्यातील विषारी द्रव्य बाहेर फेकून रक्त शुद्ध करण्याचे काम करते. आणि यामधील अँटी फंगल गुणधर्म आपले शरीर निरोगी ठेवते. आपण आता एक कार्ले स्वछ धुऊन घेणार आहोत. ते मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे आहे. यानंतर आपण याठिकाणी दुसरा घटक घेणार आहोत तो म्हणजे कापूर आणि तिसरा घटक घेणार आहोत. तो म्हणजे कोरफड. कापूर हा त्वचेवरील डाग ,पुरळ घालवण्यासाठी देखील वापरतात.

2 ते3 कापूर घेऊन त्याची बारीक पावडर बनवायची आहे. व त्यात नारळाचे तेल add करणार आहोत. यात एक चमचा नारळाचे तेल मिसळायचे आहे. यानंतर आपण बनवलेली कारल्याची पेस्ट घेणार आहोत. ही पेस्ट आता एक चमचा किंवा तुमच्या फंगल इन्फेकशन च्या प्रमाणात या वाटीत तेल मिश्रणात घेणार आहोत. यानंतर हे मिश्रण नीट मिक्स करून घ्यायचे आहे. नीट मिक्स झाल्यानंतर आपला हा उपाय तयार झाला. ही पेस्ट त्वचेवर लावताना बोटांनी न लावता.

आपण येथे एक कापूस वापरायचा आहे. जेणेकरून बोटांच्या वापराने शरीराच्या इतर भागावर होणारे इन्फेकशन थांबेल. हा कापूस या पेस्ट मध्ये बुडवून प्रभावित त्वचेवर कापसाच्या मदतीने ही पेस्ट लावायची आहे. काळजीपूर्वक संपूर्ण प्रभावित जागी ही पेस्ट लावावी. ही पेस्ट शक्यतो रात्रीच्या वेळी लावावी. सकाळी उठल्यावर तुम्ही हे कोरफड प्रभावित ठिकाणी लावायची आहे. याने त्या ठिकाणी दोन ते तीन मिनिटे मालिश केल्याने स्वछ पाण्याने त्वचा धुवावी. या उपायाच्या 7 ते 8 दिवसाच्या नियमित वापराने. संपूर्ण समस्या निघून जाते. आणि कोणतेही निशाण त्वचेवर राहत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!